app logo

सांध्याचा ऑस्टिओआर्थरायटिस : ऑर्थोबायोलॉजिक्स — नैसर्गिक व अत्याधुनिक उपचार पद्धती

Category: Orthopedics

Published DateWed May 07 2025
By Lokmanya Hospitals

ऑस्टिओआर्थरायटिस” हा सामान्य आढळणारा सांध्यांचा आजार असून जगभरात त्रासदायक ठरतो. वयोमानानुसार हळूहळू सांध्यांमध्ये झीज होत जाते आणि याच प्रक्रियेतून हा आजार सुरू होतो.

यामुळे सांध्यातील हाडांवर असलेल्या कुर्च्याची (cartilage) झीज होते, ज्यामुळे रुग्णांना वेदना, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा येतो. प्रामुख्याने गुडघे, खुबा, मनगट आणि मणक्याचे सांधे यावर परिणाम होतो.

जर रुग्ण सुरुवातीच्या अथवा मध्यम टप्प्यातील झीजेच्या अवस्थेत असतील, तर “ऑर्थोबायोलॉजिक्स” या नैसर्गिक, शस्त्रक्रियेविनाच दिल्या जाणाऱ्या इंजेक्शन स्वरूपातील उपचारांचा चांगला फायदा होतो.

ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणजे काय?

ऑर्थोबायोलॉजिक्स हे शरीराच्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले जैविक पदार्थ असतात, जे शरीराच्या नैसर्गिक बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देतात. हे इंजेक्शन स्वरूपात दिले जातात आणि हाडे, सांधे, स्नायू आणि कंडरांच्या (tendons) उपचारासाठी वापरले जातात.

ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये ऑर्थोबायोलॉजिक्सचे महत्त्व

या उपचारपद्धतीमुळे सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यातील ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये वेदना कमी होतात, सूज नियंत्रणात राहते आणि कुर्च्याची झीज मंदावते.

प्रमुख ऑर्थोबायोलॉजिक्स उपचार पद्धती

१. प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) थेरपी

या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्तातील प्लेटलेट्स वेगळे करून प्रभावित सांध्यामध्ये इंजेक्शनद्वारे दिले जातात.

प्लेटलेट्समध्ये वाढीचे घटक (growth factors) असतात, जे कुर्चा आणि ऊतींची दुरुस्ती करतात.

वेदना कमी होण्यास मदत होते आणि सांध्यांची हालचाल सुधारते.

२. स्टेम सेल थेरपी

या उपचारात रुग्णाच्या मज्जारस (bone marrow) किंवा चरबीच्या ऊतींमधून (adipose tissue) स्टेम सेल्स घेतले जातात आणि प्रभावित सांध्यामध्ये इंजेक्शनद्वारे दिले जातात.

हे स्टेम सेल्स नव्या कुर्च्याच्या निर्मितीस मदत करतात आणि वेदना कमी करतात.

हा उपचार प्रामुख्याने प्रारंभिक टप्प्यातील रुग्णांसाठी उपयुक्त असतो.

३. हायलुरोनिक अॅसिड इंजेक्शन (वंगणयुक्त द्रव्याचे इंजेक्शन)

हायलुरोनिक अॅसिड सांध्यांमधील स्नेहन (lubrication) वाढवते आणि हाडांमधील घर्षण कमी करते.

यामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते आणि वेदना कमी होतात.

हा उपचार प्रामुख्याने गुडघ्यांच्या आर्थरायटिसमध्ये उपयुक्त ठरतो.

ऑर्थोबायोलॉजिक्सचे फायदे
✔ नैसर्गिक टिश्यूच्या पुनरुत्पत्तीला चालना
✔ वेदना कमी करणे
✔ शस्त्रक्रियेची गरज कमी करणे
✔ सुरक्षित, कमी दुष्परिणाम असलेला उपचार


टीप: उपचारांचा परिणाम व्यक्तिनुसार वेगवेगळा असतो. पूर्णपणे कुर्चा निर्माण करणे शक्य नसले तरी आजाराची प्रगती मंदावू शकते. हे उपचार महाग असू शकतात आणि सर्वत्र सहज उपलब्ध नसतात.

निष्कर्ष

ऑर्थोबायोलॉजिक्स हे ऑस्टिओआर्थरायटिसवरील आधुनिक आणि आशादायक पर्याय आहेत. पारंपरिक वेदनाशामक औषधांपेक्षा हे दीर्घकालीन फायदा देणारे असून शरीराच्या नैसर्गिक पुनर्बांधणी क्षमतेला चालना देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार निवडल्यास रुग्णांच्या सांध्यांचे आरोग्य लक्षणीयपणे सुधारू शकते.

जेंव्हा शस्त्रक्रिया हवीच लागते…
जेव्हा औषधे, इंजेक्शन, किंवा इतर उपाय करूनही गुडघेदुखी थांबत नाही आणि कुर्च्याची पूर्ण झीज झालेली असते, तेव्हा कृत्रिम सांधेरोपण (Joint Replacement) करावे लागते.

अत्याधुनिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

आजकाल ही शस्त्रक्रिया रोबोटच्या सहाय्याने केली जाते. हे सर्वात प्रगत तंत्रज्ञान असून:

  • रुग्णाच्या गुडघ्याची रिअल टाईम इमेज सर्जनला स्क्रीनवर दिसते.
  • खराब कुर्च्याचे अचूक मॅपिंग करून तेवढाच भाग शस्त्रक्रियेतून काढला जातो.
  • यामुळे नैसर्गिक रचना जास्त प्रमाणात जपली जाते.
  • सर्जनला अधिक अचूकता मिळते व ऑपरेशन सुलभ होते.
  • वेळ कमी लागतो आणि जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो.
  • हॉस्पिटलमधील राहण्याचा कालावधी २–३ दिवसांपर्यंत मर्यादित असतो.
  • दुसऱ्या दिवशीच रुग्ण चालू शकतो आणि जिने चढण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • काही दिवसांत रुग्ण पोहणे, मांडी घालून बसणे, प्रवास करणे, गाडी चालवणे हे सर्व सहज करू शकतो.

Video Insight By Dr. Narendra Vaidya

Dr. Narendra Vaidya

Chairman & Chief Orthopedic Joint Replacement Surgeon

View Profile